इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खर्गे नावाची चर्चा सुरू होताच पाटण्यात पोस्टरवॉर

638 0

नवी दिल्ली: नुकतीच इंडिया आघाडीचे बैठक राजधानी नवी दिल्लीत संपन्न झाली सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तब्बल 28 पक्षांचे प्रमुख या आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते.

या इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वयक म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून देखील मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलं आहे मात्र मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवताच इंडिया आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड झालेत.

मल्लिकार्जुन खर्गे यांचा नाव समोर येतात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यानंतर आता बिहारची राजधानी पाटणा शहरात नितेश कुमार यांचे फ्लेक्स झळकत असून हे फ्लेक्स सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले.

अगर सच में जीत चाहिए तो फिर एक निश्चय चाहिए एक नीतीश चाहिए असा मजकूर या फ्लेक्स वर लिहिण्यात आलाय

Share This News
error: Content is protected !!