विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. कुठे काही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस आणि निवडणूक विभागाची पथकं डोळ्यात तेल घालून वाहनं तपासत आहेत. त्यातच मुंबईमध्ये एका छोट्या टेम्पोत साडेसहा टन वजनाच्या विटा सापडल्या आहेत.
मागील महिन्यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. तेव्हापासून राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
त्यानंतर राज्यामध्ये सरकार स्थापन केले जाणार आहे. पण त्यापूर्वी विक्रोळीमध्ये मोठा छापा मारण्यात आला आहे. आचारसंहितेच्या काळात राज्यभरात पैशांचा पाऊस पडू लागला आहे.
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत आतापर्यंत कोट्यवधींचं घबाड जप्त केले आहे.