महापालिका निवडणुकीत संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली असून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे.
15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी 39 हजार निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 39 हजार 147 मतदार केंद्र असणार आहेत.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
31 डिसेंबर रोजी होणार उमेदवारी अर्जांची छाननी
दोन डिसेंबर 2026 अर्ज माघारीची मुदत
3 जानेवारी 2026 ला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार
15 जानेवारी रोजी निवडणूक
16 जानेवारी रोजी मतमोजणी