अंकुश शिंदे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त 

761 0

मुंबईचे विशेष सुधार सेवेचे पोलीस महासंचालक अंकुश शिंदे यांची पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर पिंपरी-चिंचवड चे सध्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे कृष्णप्रकाश यांची व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत राज्याच्या गृह विभागाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

अंकुश शिंदे यांनी या अगोदर नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीमध्ये पोलिस उपमहानिरीक्षक पदावर काम केले असून त्यांनी काही काळ सोलापूर येथे पोलीस आयुक्त म्हणून काम केले होते व सध्या शिंदे मुंबईचे विशेष सुधार सेवेचे पोलीस महासंचालक म्हणुन कार्यरत होते.

Share This News
error: Content is protected !!