अमित शहा, राज ठाकरेंची भेट होणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

211 0

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ सप्टेंबरला मुंबईत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

मनसे आणि भाजपच्या युतीची घोषणा होणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक भाजपाच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात भेट होणार का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही भेट होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्र  फडणवीस म्हणाले की दरवर्षी अमित शहा गणेशोत्सवात मुंबईत येत असतात या दौऱ्यात कोणतेही राजकीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलं नाही

Share This News
error: Content is protected !!