सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अन् सध्या पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट आणि पोलिस अंमलदार विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
पद्माकर घनवट आणि विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने तक्रार केली असून घनवट आणि शिक्रे यांनी 12 लाख 30 हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत एका बांधकाम व्यावसायिक राजेंद्र चोरगे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार चोरगे यांची सातारा शहरात शैक्षणिक संस्था आहे. ते १४ वर्षांपासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहतात. दरम्यान, संस्थेच्या विरोधात कोणतीही तक्रार नसताना तत्कालीन सातारा ‘एलसीबी’चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि शिर्के संस्थेत येऊन नाहक त्रास देत होत.
पोलीस ठाण्यातील चौकशी दरम्यान त्रास देऊन ‘ब्लॅकमेल’ करत होते. पत्नी व संस्थेतील महिला प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना सूर्यास्तानंतर ताब्यात ठेवत होते. तसलेच घनवट आणि शिर्के यांनी २५ लाख रुपये खंडणी मागून १२ लाख ३० हजार रुपये घेतल्याचाही आरोप चोरगे यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.