AKSHAY SHINDE ENCOUNTER: याला एन्काऊंटर म्हणायचं का? अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयाचे पोलीस यंत्रणेवर ताशेरे; उपस्थित केले ‘हे’ बारा सवाल

213 0

बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या जीपमध्ये असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि पोलिसांवरच तीन गोळ्या फायर केल्या,

यातली एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलीस निरिक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली, यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला.

दरम्यान याच एन्काऊंटर वरून आता उच्च न्यायालयाने पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढत तब्बल 12 सवाल उपस्थित केलेत गोळी जवळून मारली गेली असही निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे

उच्च न्यायालयाने पोलीस यंत्रणेवर उपस्थित केलेले बारा सवाल कोणते?

  1. अक्षय शिंदे च्या डोक्यात गोळी का मारली गेली?
  2. पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर 
  3. सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही 
  4. याला एन्काऊंटर बोलू शकत नाही एन्काऊंटर म्हणू शकत नाही एन्काऊंटरची व्याख्या वेगळी; कोर्टाचं निरीक्षण 
  5. तीन गोळ्या मारल्या एक लागली तर दोन गोळ्या कुठे गेल्या 
  6. पिस्तूल की गोळी मारली की रिव्हॉल्वरमधून
  7. आरोपीला काबू करायला हवं होतं गोळी का मारली चार पोलीस एका आरोपीला काबू करू शकत नव्हते का 
  8. फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये गडबड असेल तर कठोर पावलं उचलावी लागतील 
  9. पिस्तूल अनलॉक करून गोळी मारली होती का? 
  10. पोलिसांची पिस्तूल अनलॉक होती का? 
  11. जप्त केलेल्या हत्यार कुठं आहे
  12. गोळी जवळून मारली गेली शवविच्छेदन अहवाल बघून कोर्टाने नोंदवलं निरीक्षण 
Share This News
error: Content is protected !!