ब्रेकिंग न्यूज

Akola News: अकोल्यात ठाकरे गटाचे शहराध्यक्ष राहुल काराळेंच्या गाडीवर हल्ला

अकोला : Anchor : अकोल्यातून एक मोठी बातमी . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष राहुल काराळेयांच्या गाडीवर ४ ते ५ जणांनी  हल्ला करत गाडीची प्रचंड तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर पोलीस वेळेवर न आल्याने शिवसेना आमदार नितीन देशमुख चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.Vo : रात्रीच्या सुमारास ४ ते ५ अज्ञात तरुण हातात पाईप आणि दगड घेऊन आले. त्यांनी राहुल काराळे यांच्या कारवर जोरदार हल्ला चढवला आणि काचा फोडून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख तिथे पोहोचले. मात्र, पोलिसांना फोन करूनही ते वेळेवर न आल्याने देशमुखांचा पारा चढला. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तिथेच तीव्र नाराजी व्यक्त केली