'मला मंत्री करण्याची अजितदादांची इच्छा'; सुनील शेळके यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

SUNIL SHELKE: ‘मला मंत्री करण्याची अजितदादांची इच्छा’; सुनील शेळके यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

129 0

राज्यातील नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अवघे दोन दिवस बाकी आहेत. या नव्या मंत्रिमंडळात ज्येष्ठांसह नवीन चेहऱ्यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यातच आता विरोधकांचे पराभवाचे सगळे प्रयत्न उलथवून लावून विक्रमी मतांनी विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी त्याच आशाच वक्तव्य केलं आहे. ‘मला मंत्री करण्याची अजितदादांचीही इच्छा आहे’, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केले आहे.

शेळकेंना मंत्रीपदाचे वेध ?

सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत ताकत लावूनही एक लाख आठ हजारच्या मताधिक्याने अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले. मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांवर सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशा बातम्या पाहिल्या. परंतु मी अजित पवार किंवा प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारख्या पक्षातील कोणत्याच मोठ्या नेत्यांकडे माझी व्यक्तिगत इच्छा व्यक्त केलेली नाही. मात्र मला मंत्री करण्याची अजित दादांची ही इच्छा असेल’, असं सुनील शेळके म्हणाले आहेत.

पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

पुढे बोलताना सुनील शेळके म्हणाले, ‘भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महायुतीमध्ये आहेत. या पक्षातील प्रमुख नेत्यांना आधी मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल. त्यानंतर नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी जबाबदारी दिली तर माझ्या पक्षासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी अधिक काम करण्याची माझी तयारी आहे.’

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!