Ajit Pawar

Guardian Minister : पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर ! चंद्रकांतदादाना डच्चू देत अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद

569 0

मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून (Guardian Minister) भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

सुधारित 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Share This News
error: Content is protected !!