Afghan boy stowaway Delhi flight: सध्या सगळीकडे एका १३ वर्षांच्या अफगाणी मुलाची चर्चा सुरू आहे. एवढा लहान मुलगा भारतात आलाच कसा, विमानांच्या (Afghan boy stowaway Delhi flight) चाकावर बसून तो जिवंत कसा राहिला आणि तो विमानांच्या चाकापर्यंत पोहोचला तरी कसा असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत.
चला तर जाणून घेऊया काय आहे नेमकं हे प्रकरण
२१ सप्टेंबरला, अफगाणिस्तानच्या काबूलहून सकाळी ११ वाजता काम एअरचे विमान (Afghan boy stowaway Delhi flight) दिल्लीसाठी रवाना झाले. हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर विमानाच्या चाकाजवळ काहीतरी लपल्यासारखं दिसलं. त्यानंतर जेव्हा तपासणी केली, तेव्हा त्यात चक्क एक १३ वर्षांचा अफगाणी मुलगा आढळून आला. या मुलाचं नाव मोहम्मद असल्याचं समजतं. या मुलाची चौकशी केली असता, त्याने सांगितलं की तो एका पॅसेंजर कारच्या मागे लपून काबूल विमानतळावर पोहोचला होता. त्याला वाटलं होतं की हे विमान इराणला जाणार आहे, त्यामुळे तो या विमानाच्या चाकाजवळ लपून बसला. त्याला हे माहीत नव्हतं की हे विमान दिल्लीला जाणार आहे.
SHIRUR AMOL JEWELLER ROBBERY CCTV: शिरूरमधील अमोल ज्वेलर्सवर दरोडा; 1 कोटी 38 लाखांचा ऐवज लंपास
काबूलहून दिल्लीपर्यंतचा हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांचा होता. पण, विमानाची उंची आणि दाब कमी असल्यामुळे तो प्रचंड (Afghan boy stowaway Delhi flight) थंडीने गारठला होता. दिल्ली विमानतळावर सीआयएसएफ (CISF) जवानांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. चौकशीनंतर, २२ सप्टेंबरला त्याला पुन्हा काम एअरच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत काबूलला पाठवण्यात आलं.
NASHIK RATION CARD: नाशिकच्या दुरुनगर परिसरात कचराकुंडीत आढळली 150- 200 रेशनकार्ड
या घटनेमुळे काबूल विमानतळाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढा लहान मुलगा इतक्या सहजपणे विमानाच्या चाकापर्यंत कसा पोहोचला, हे खूप धक्कादायक आहे. यावरून काबूल विमानतळावरील प्रशासनाची कार्यपद्धती किती ढिसाळ आहे हे सिद्ध होते. अनेक सुरक्षा तज्ज्ञांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ही घटना केवळ एका मुलाच्या प्रवासापुरती मर्यादित नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही हा एक मोठा धोका आहे. या घटनेमुळे दहशतवादी किंवा इतर गुन्हेगार अशाच प्रकारे विमानांमध्ये घुसखोरी करू शकतात अशी भीती निर्माण झाली आहे.
Pune Metro Women Train Drivers: नवरात्रीच्या सुरुवातीलाच पुणे मेट्रोचा ‘नारी शक्ती’ला पाठिंबा
ही घटना केवळ अफगाणिस्तानच्याच नव्हे तर जागतिक विमानतळ सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. विमानाच्या प्रत्येक भागाची सखोल तपासणी, विमानतळावर गस्त वाढवणे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण देणे यासारख्या उपायांवर भर द्यावा लागेल.