अखेर… अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र मुक्काम कारागृहातच, कारण…

557 0

 

ठाणे- गेले काही दिवस राज्यात केतकी चितळे हे नाव राज्यात चर्चेत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. मात्र आता अभिनेत्री केतकी चितळेची जेलवारी ही बऱ्याच दिवसानंतर संपली आहे. कारण केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.

वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तिचा मुक्काम ठाणे कारागृहातच राहणार आहे.

काय होतं अॅट्रोसिटी प्रकरण?

केतकीने 1 मार्च 2020 मध्ये एक पोस्ट व्हायरल केली होती. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीविरोधात ही कारवाई केली होती. या वादग्रस्त पोस्टमध्ये तिने धर्माचा उल्लेख केल्याने ती पोस्ट अधिक व्हायरल झाली होती. नवबौध्द लोक 6 डिसेंबरला मुंबई दर्शनास येतात. अशा पध्दतीची पोस्ट तिने सोशल मीडियावरती शेअर केली होती आणि नवबौध्द या वाक्याचा संदर्भ देत स्वप्निल गोविंद जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरूनच केतकीला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टानं तिला कोठडी सुनावली होती. तसेच एका समाजाची लोक मोफत आणि मुंबई पाहायला मिळते म्हणून येतात अशी पोस्ट केतकीने केली होती आणि तिच्या याच पोस्टवर सडकून टीका झाली होती. यानंतर केतकीविरोधात आक्रमक वातावरण तयार झालं होतं.

 

 

Share This News
error: Content is protected !!