कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

159 0

मुंबई: मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

मात्र आता या  आता एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून आपली शरद पवार यांच्यासोबत भेट झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

बाबत शिंदे यांनी ट्विट केलं असून आपल्या ट्विट मध्ये शिंदे म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही.

 

या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे.  आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

 

Share This News
error: Content is protected !!