Buldhana Bus Accident

नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर अपघात; 25 प्रवाशांचा मृत्यू

1967 0

बुलढाणा: सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरकडून पुण्याच्या दिशेने असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 ला भीषण अपघात होऊन आग लागल्यानं मोठया प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.प्राथमिक माहितीनुसार गाडीमध्ये 29 प्रवासी व ट्रॅव्हलचे तीन कर्मचारी होते.

पैकी सात ते आठ प्रवासी बाहेर पडले असून 26 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.घटनास्थळी पोलीस, आरोग्य, महसूल सह इतर शासकीय गा उपस्थित असून बचाव कार्य सुरु आहे. तसेच प्रवाशांची नावे मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बस मध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस प्रवास करत होती.

बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला. बसमधील आठ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर हा अपघात झाला.

 

Share This News
error: Content is protected !!