ब्रेकिंग न्यूज

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! 10 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा उत्सव साजरा केला जात आहे.

देशातील विविध कानाकोऱ्यातून कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहे.

मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते, ज्यामध्ये १० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाल्याची भीती आहे.

पीएम मोदींनीकडून योगी आदित्यनाथ यांना फोन

पीएम मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन केला आणि घटनेची संपूर्ण माहिती घेतली. भाविकांपर्यंत तातडीनं उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे.