…अखेर ‘त्या’ वादग्रस्त घोषणेप्रकरणी गुन्हा दाखल

316 0

पुणे: देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरून गुरुवारी पी.एफ.आय. संघटनेच्या अनेक कार्यालयांवर ठिक ठिकाणी NIA आणि ईडीकडून छापे टाकण्यात आले. पुण्यातून सुद्धा कयुम खान आणि रझी अहमद खान या दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. 

कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आला आणि आंदोलन दरम्यान आंदोलन कर्त्यांमधील काहीजणांनी पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिल्याने राज्यातील वातावरण तापलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे मागणी केली नंतर पुणे पोलिसांनी सुरुवातीला पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली गेली नसल्याचं म्हंटलं होतं.

मात्र  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड विधान कलम 153, 124, 109, 120 ब.. या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!