जालना: शहरातील एका स्टील कारखानदारांवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला असून तब्बल 390 कोटी रुपयांचं घबाड जप्त करण्यात आलं आहे.
स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. त्यात ५८ कोटींची रक्कम, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला.
कारवाई केलेल्या कारखानदाराचे नाव आयकर विभागाने अद्याप जाहीर केले नाही. ही कारवाई अद्यापही सुरु आहे. आयकर विभागाला संशय आहे की, या कारखानदाराचा काळा पैसा औरंगबाद येथली एक प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापारी गुंतवणूक करुन पांढरा करत आहे. याबाबतही शोधमोहिम सुरु आहे. आयकर विभाग कागदपत्रे आणि इतर बाबींची अद्यापही पडताळणी करत आहेत.