मोठी बातमी! पीएफआयवर 5 वर्षांची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

248 0

नवी दिल्ली: दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालायने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. पीएफआयला केंद्राने बेकायदेशीर संस्था असल्याचं घोषित केलं आहे.

‘पीएफआय’ म्हणजेच पॉप्युलर फ्रॅन्ट ऑफ इंडिया या संघटनेवर भारतात पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. सोबतच ‘पीएफआय’शी संबधित संघटनांवरही बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएफआय दिल्ली, आंध्र प्रदेश , आसाम, बिहार, केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात सक्रिय आहे. 15 राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या या संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानं पीएफआयचं धाबं दणाणलयं आहे. एनआयएकडून कसून तपास केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!