ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

महायुतीत 182 जागांची घोषणा पण 18 जागांवर तिढा कायम; कोणत्या आहेत ‘या’ 18 जागा

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाले असून महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदानाने 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सर्वच पक्ष तयारी करत असताना महायुतीतील तीनही पक्षांनी मिळून आतापर्यंत 182 जागा घोषित केल्यात. यामध्ये भाजपाने 99 शिवसेनेने 45 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 38 उमेदवारांची घोषणा केली आहे मात्र असं असलं तरी महायुती आतापर्यंत 18 जागांवर तिढा कायम आहे.

कोणत्या आहेत या 18 जागा?

  1. अंधेरी पूर्व
  2. दिंडोशी
  3. कलिना
  4. चेंबूर
  5. वरळी
  6. वर्सोवा
  7. शिवडी
  8. धारावी
  9. मीरा-भाईंदर
  10. कोल्हापूर उत्तर
  11. गुहागर
  12. करमाळा
  13. बार्शी
  14. कोपरगाव
  15. गंगाखेड
  16. लोहा
  17. बडनेरा
  18. बाळापुर