पुणेकर जगताप यांना जागा दाखवतील ; सभागृह नेते गणेश बिडकर यांचे प्रतिउत्तर (व्हिडिओ)

152 0

राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर महाविकास आघाडी कसा करत आहे, हे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणेकरांच्या लक्षात आले आहे. पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत महाविकास आघाडीने नियमबाह्य पद्धतीने प्रभाग रचना केली तरी येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत पुणेकर मतदार त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा समाचार घेतला. निवडणुकीच्या निकालानंतर जगताप यांचा भ्रम निश्चित दूर होईल, असा दावा बिडकर यांनी केला.

प्रभाग रचना करताना टेकडीमुळे तयार होणारी नैसर्गिक हद्द तोडून विचित्र प्रभाग जोडावा लागत असेल, तर सरळमार्गी राजकारण करून आपल्याला जिंकता येणार नाही हेच जगतापांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले का? काही महिन्यांपासून आघाडीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता थेट स्वबळावर लढण्यास समर्थ असून, १२२ जागांवर विजय मिळवू असा दावा शहराध्यक्ष जगताप करत आहेत, ही संख्या पुणे महानगरपालिकेची नाही तर पिंपरी चिंचवड आणि अन्य स्वराज्य संस्थांमधील असेल, असा टोला बिडकर यांनी लावला. जाती धर्माचे राजकारण करून आपण जिंकू असा समज जगताप यांनी करून घेतला आहे. मात्र त्यांना माहीत नाही सुज्ञ पुणेकर जाती- धर्मावर मतदान करत नाही. तो काम बघतो, आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्रजी यांचे काम पाहिले आहे, चार वर्षात पळणारी मेट्रो पहिली आहे.
स्वबळाची भाषा करणारे जगताप हे विसरतात की राज्यात तसेच देशात सत्ता असून ही त्यांचा आकडा कधी ६० च्या वर गेलेला नाही. ‘बेडूक फुगवला म्हणून तो हत्ती होत नाही’, असेही बिडकर म्हणाले. मागच्या पंचवार्षिक मध्ये प्रशांत जगताप हे महापौर असताना त्यांच्या पक्षाचा महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊन परत नाचक्की होऊ नये, यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही त्यामुळेच भाजप मधील नगरसेवक आपल्याकडे येण्यास इच्छूक असल्याच्या घोषणा जगताप करत आहेत. पुढील २४ तासात राष्ट्रवादीने ८० उमेदवारांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान सभागृह नेते बिडकर यांनी दिले. पुणेकर फक्त विकासाला मतदान करतात. थापाड्यांना नाही. टेंडरमधल्या टक्केवारीसाठी आरडाओरड करणाऱ्यांना जनता जागा दाखवते. शहराच्या विकासासाठी भकास आघाडी नको, की भ्रष्टवादी राष्ट्रवादी नको, म्हणनूच पुणेकरांनी ठरवले आहे. पुण्यासाठी पर्याय एकच, ‘यंदा परत कमळच..’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कायदेशीर लढा देणार
सत्तेचा चुकीचा वापर करून महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचना केली आहे. याविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या प्रभागांवर हरकती आणि सूचना नोंदविण्यात येणार असून त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यास भाग पाडू असा निर्धार बिडकर यांनी व्यक्त केला.

Share This News

Related Post

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी मोजावे लागणार पैसे

Posted by - May 10, 2022 0
पुणे – पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आता मोफत वाहने पार्क करता येणार नाहीत. याठिकाणी पे अँड पार्क योजना लागू करण्यात…

पुणे नवरात्रौ महिला महोत्सव : 28 सप्टेंबर रोजी महिला महोत्सवाचे होणार शानदार उदघाटन ; तेजस्विनी पुरस्कार प्रदान सोहळा ठरणार खास आकर्षण

Posted by - September 27, 2022 0
पुणे : महिलांच्या कला गुणांना वाव देणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा २२ वे वर्ष साजरे करत आहे. यंदा हा…

Patthe Bapurao Award : राज्यस्तरीय पठ्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर

Posted by - November 28, 2023 0
पुणे : लोककला क्षेत्रासाठी योगदान देणार्या व्यक्तींना शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार (Patthe Bapurao Award) देण्यात येतात. यंदाचे…

Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी

Posted by - November 10, 2023 0
पुणे : कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *