PUNE WATER REDUCTION : 12 जूनला पुणेकरांची पाण्यासाठी मारामार! बाणेर, बावधन, येरवडा, खराडीमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार!

100 0

PUNE WATER REDUCTION : पावसाळ्याच्या तोंडावर पुणेकरांना मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.

12 जून रोजी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीमुळे आणि नवीन पाईपलाईन जोडणीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

PUNE WATER REDUCTION NEWS : पुण्यात 12 जूनला अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा बंद!
पुणे शहरात पावसाळ्याची चाहूल लागली असतानाच, नागरिकांना आता 12 जून रोजी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल आणि

मुख्य जलवाहिनीच्या जोडणीसाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील सुमारे 50 टक्के भागाचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणी बंद राहणाऱ्या प्रमुख भागांमध्ये बावधन, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सारथी शिल्प, शास्त्रीनगर, व्यू लक्ष्मीनगर, निम्हणमळा, डुक्करखिंड, शांतीबन सोसायटी,

गुरूगणेश नगर, सुरजनगर, लोहगाव, येरवडा, धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, संजय पार्क, टिंगरेनगर इत्यादी परिसरांचा समावेश आहे.
वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या अधिपत्याखालील चांदणी चौक, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड, कोकाटे वस्ती, भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी,

मधुबन सोसायटी, पूजा पार्क या ठिकाणी देखील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

PUNE WATER DAM INCREASE: पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीचं संकट टळणार; खडकवासला धरण साखळी प्रकल्पात प्रकल्पात तब्बल इतका पाणीसाठा

महापालिकेने स्पष्ट केलं की बालेवाडी जकात नाका, सन हॉरायझन, बाणेर वेस्ट, लेक टाकी, पॅनकार्ड रोड, सुस रोड येथील

साठवण टाक्यांमध्येही मुख्य जलवाहिन्यांशी नव्या लाईन जोडल्या जाणार आहेत.

त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागेल…

भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी, नवीन जलवाहिन्या आणि व्हॉल्व्हची जोडणी केली जाणार आहे.

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

13 जून रोजी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि जपून वापरण्याचे आवाहन केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!