पुणे : शहराच्या आरोग्यसेवेला नवी दिशा देणाऱ्या कमला नेहरू रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाची सुरुवात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली आहे. १३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन त्यांनी केले. ही कामे पूर्ण झल्यानंतर हे रुग्णालय शहरातील आणि प्रभाग 24 मधील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा मैलाचा दगड ठरणार आहे.
प्रभाग २४ (कसबा गणपती – कमला नेहरू – केईएम हॉस्पिटल) मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कमला नेहरू रुग्णालयाच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. या रुग्णालयाशी त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने त्यांनी नेहमीच या रुग्णालयाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी १३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयात पाच अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स, विस्तारीकरण, सुशोभीकरण, रुग्णांसाठी प्रतीक्षालय, उपाहारगृह तसेच ऑन-ग्रीड सोलर यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालय प्रभागातील तसेच शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे वरदान ठरणार आहे.
बिडकर यांचा कमला नेहरू रुग्णालयाशी खोलवर संबंध आहे. त्यांच्या आई नंदिनी बिडकर यांनी येथे १८ वर्षे परिचारिकेचे काम केले. लहानपणी आईच्या हात धरून ते या रुग्णालयात फिरले आहेत. त्यामुळे या वास्तूबद्दल त्यांच्या मनात विशेष आत्मीयता आहे.
त्यांचे वडील कै. मधुकर बिडकर (माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष) यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाची अनेक विकासकामे मार्गी लागली. पुढे गणेश बिडकर यांच्या नगरसेवकपदाच्या आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या काळातही रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
आज रुग्णालयात सीटी स्कॅन, अँजिओग्राफी, कॅथलॅब यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कै. मधुकर बिडकर यांच्या स्मरणार्थ २४ तास रक्तपेढीही सुरू आहे. या सर्व विकासाचे श्रेय बिडकर कुटुंबीयांच्या दूरदृष्टीला आणि गणेश बिडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते.
“कमला नेहरू रुग्णालयाशी असलेल्या ऋणानुबंधांमुळे या रुग्णालयाच्या सुधारणेसाठी कितीही प्रयत्न केले तरी ते कमीच पडतील,” अशी भावना गणेश बिडकर यांनी व्यक्त केली.