MAHARASHTRA LOCAL BODY ELECTION: 29 महानगरपालिकासाठी नवा प्रभाग आराखडा तयार केला जाणार

304 0

MAHARASHTRA LOCAL BODY ELECTION: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार नगर विकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार वर्गवारी करून प्रभाग रचना केली जाणार आहे

त्या नुसार प्रभाग रचनेचे प्रारूप करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम आहे जाहीर करण्यात आला.

TOP NEWS MARATHI BJP का सांगतोय 105 जागांवर दावा; मग SHIVSENA व NCP नं करायचं काय?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

त्यानुसार राज्य निवडणूक आयोग होणाऱ्या राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिल्यानंतर

नगरविकास विभागाने नुकतीच राज्यामधील अ, ब आणि क या वर्गवारी मधील 9 आणि ड वर्गातील 19 महापालिकेंच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहे.

Local body elections: महापालिका निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या ; सुप्रीम कोर्टाचे आदेश

मुंबई महानगरपालिकेसाठी एक सदस्य प्रभाग रचना असणार आहे तर इतर महानगरपालिकांसाठी चार सदस्य प्रभाग रचना असणार आहे
नगर विकास विभागाने केलेल्या वर्गवारीनुसार
अ वर्ग महानगरपालिकामध्ये पुणे, नागपूर,

ब वर्ग महानगरपालिकामध्ये – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड,

क वर्ग महानगरपालिका – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली,

ड वर्ग महानगरपालिकामध्ये -अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर,

संगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर,

भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी

आणि जालना यांचा समावेश असणार आहे.

PMC FOUR MEMBER WARD STRUCTURE: 42 प्रभाग 165 नगरसेवक;चार सदस्यीय प्रभाग रचना कुणाच्या फायद्याची?

या संबंधित महापालिकांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे..

11 ते 16 जून : प्रगणक गटाची मांडणी
17 ते 18 जून : जनगणनेची माहिती तपासणी
19 ते 23 जून : स्थळ पाहणी करणे
24 ते 30 जून : गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे
1 ते 3 जुलै : नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दींची जागेवर जाऊन तपासणी
4 ते 7 जुलै : प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने सह्या करणे
8 ते 10 जुलै : प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणे
22 ते 31 जुलै : प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागवणे
1 ते 11 ऑगस्ट : हरकतींवर सुनावणी घेणे
12 ते 18 ऑगस्ट : हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला पाठवणे
29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर : आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे…
सप्टेंबर महिन्यात प्रभाग रचना अंतिम होणार आहे.

TOP NEWS SPECIAL REPORT : हिवाळी अधिवेशनाची भरकटलेली ‘दिशा’

 

Share This News
error: Content is protected !!