अंबरनाथ(AMBARNATH) नगरपरिषदेत घडलेल्या सत्तासंघर्षावर शिवसेनेचे (SHIVSENA) खासदार व प्रवक्ते संजय राऊत (SANJAY RAUT)यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यात (THANE) माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण(RAVINDRA CHAVAN) यांनी राजकीय डावपेच रचल्याचा आरोप केला.
अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांनी भाजपमध्ये (BJP)प्रवेश केल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसने (CONGRESS) कारवाई केल्यानंतर लगेचच त्या नगरसेवकांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवणे हाच या सगळ्या हालचालींचा मुख्य उद्देश असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपवर(BJP) टीका करताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात वैचारिक राजकारणाची जागा संधीसाधूपणाने घेतली आहे. काँग्रेस किंवा शिवसेना नसतील तर भाजपचे अस्तित्वच शक्य नाही, असा दावा त्यांनी केला. पूर्वी पक्षांमध्ये नेते घडवले जात होते, मात्र आता इतर पक्षांतील नेते पळवून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.