माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींनी दिले पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

485 0

पुणे: माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही कलमाडी यांनी यावेळी दिली आहे. यावेळी कलमाडी काठीच्या साहाय्याने चालताना दिसले.

काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. पुणे फेस्टिव्हलचं आमंत्रण महानगर पालिका आयुक्तांना देण्यासाठी आपण इथं आलो असल्याचं कलमाडी यांनी सांगितलं. यावेळी कलमाडी काठीचा आधार घेऊन चालत असल्याचं दिसून आलं. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, नगरसेवक आबा बागुल, संगीता तिवारी उपस्थित होते.
सुरेश कलमाडी तब्बल १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत आले आहेत. कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर सुरेश कलमाडी यांना आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून लांब गेले होते. यावेळी अनेक दिवसांनी कलमाडी माध्यमांसमोर आले होते.

Share This News
error: Content is protected !!