राज्य सरकारच्या ‘या’ एका निर्णयामुळे पुणे महानगरपलिकेचे सुमारे दीड कोटी पाण्यात

165 0

पुणे: महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावर्षी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाला असून या खर्चावर आता पाणी सोडावे लागणार आहे.

पुणे महापालिकेची  प्रभाग रचना रद्द झाल्याने जवळपास 25 लाख रुपयांच्या मतदार याद्यादेखील आता वाया जाणार आहेत. तीन सदस्यीय प्रभाग झाल्यानंतर महापालिकेने जवळपास 25 लाख रुपये खर्च करून मतदार याद्या तयार केल्या होत्या. पण आता तयार केलेल्या या मतदार याद्यादेखील वाया जाणार आहेत. यातील फक्त काहीच याद्या या विक्री झाल्या होत्या. त्यातून महापालिकेला केवळ 5 लाख रुपयांच उत्पन्न भेटले होते. त्यासोबतच आधी पूर्ण करण्यात आलेली निवडणुकीची सगळी प्रक्रिया रद्द झाल्याने पालिकेला जवळपास दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!