NCP TOGATHER: ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; स्वतः अजित पवारांनी केली घोषणा

66 0

राज्यात महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतानाच आता राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाचे बातमी समोर आली असून काका पुतण्या एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे याबाबतची घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः केली आहे ते पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित प्रचार शुभारंभ सभेत बोलत होते. विकासासाठी काही निर्णय घ्यावे लागतात दोन परिवार एकत्र येत आहेत असं म्हणत असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळा चिन्हावर तर शरद पवारांचे राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर निवडणूक लढेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं.

दरम्यान पिंपरी चिंचवड बाबत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादीचा निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!