पुणे महानगरपालिकेतील हिरवळीवर बसण्यास नागरिकांना मनाई; आपचा आंदोलनाचा इशारा

367 0

 

पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर हिरवळीवर जाण्यास, बाकड्यावर बसण्यास नागरिकांना महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक मनाई करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये दररोज मोठ्या संख्येने सामान्य नागरिक त्यांची प्रशासकीय कामे घेऊन येत असतात. अनेकदा मनपाचे अधिकारी अनेकदा जागेवर उपस्थित नसतात, वेळेवर कामाला येत नाहीत, जेवणाची सुट्टी लवकर संपत नाही. अशा वेळी नागरिकांनी कुठे जायचंय असा प्रश्न तयार होतो. अनेकदा अधिकारी हे प्रशासकीय बैठकांना गेलेले असतात किंवा तसे नागरिकांना सांगितले तरी जाते. महापालिकेमध्ये अशा नागरिकांसाठी वेटिंग रूम किंवा बसण्याची वेगळी व्यवस्था प्रत्येक विभाग निहाय नसल्यामुळे अशावेळी महानगरपालिकेच्या प्रांगणातील हिरवळीवर बसून अथवा बाकड्यावर बसून वाट पाहण्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना गत्यंतर नसते. ती सुद्धा व्यवस्था आता महानगरपालिकेने बंद केल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे असून हे आदेश पुणे महानगरपालिकेकडून तातडीनं मागे घेण्यात आले नाहीत आम्ही आंदोलन करू असा इशारा आम आदमी पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!