लाल वादळ माघारी फिरणार; किसान लाँग मार्च स्थगित करत असल्याची माहिती

300 0

आपल्या विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावित ही माहिती दिली आहे.

जे. पी. गावित यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला निवेदनाची प्रत दिली. 70 टक्के मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारच्या निवेदनाची प्रत मोर्चेकरांना वाचून दाखवणार असल्याचे गावित यांनी सांगितले.

नाशिकहून मुंबईच्या दिशेनं हा लाँगमार्च निघाला होता यामध्ये लाखो शेतकरी सहभागी झाले होते. मंत्री दादाजी भूसे, अतुल सावे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी समिती गठीत करण्यात आली होती.

Share This News
error: Content is protected !!