स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक आंदोलन

152 0

साखर कारखानदारांनी विना कपात एक रकमी एफ आर पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे. अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

मात्र याकडे कोणीच हवे तसे लक्ष देत नाही. म्हणूनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ व १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करीत आहोत. त्यातूनही दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कराड येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.

Share This News
error: Content is protected !!