Nashik fertilizer scam: नाशिकमध्ये कृषी विभागानं मोठी कारवाई करत बनावट खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्या
विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे.Nashik fertilizer scam:
यामध्ये तब्बल २४ विक्रेत्यांचे परवाने तात्काळ
निलंबित करण्यात आले आहेत.
Nashik News : शेतकऱ्यांना विकली जात होती भेसळयुक्त खतं,नाशिकमध्ये विक्रेत्यांवर मोठी कारवाई !
बनावट व भेसळयुक्त खते आणि औषधं विक्री होत असल्याच्या तक्रारींवरून
ही कारवाई करण्यात आली आहे.
यापैकी ४ परवाना धारकांविरोधात पोलिसांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना भेसळयुक्त खते विकले जात असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत होते.
त्यामुळे विक्रेत्यांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी खते किंवा औषधं खरेदी करताना अधिकृत दुकानातून
आणि बिले घेऊनच खरेदी करावीत,
असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १९ परवाना धारकांची सुनावणी बाकी असून, लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
तसेच, दोन कंपन्यांच्या खोट्या जाहिरातींबाबत एफआयआर दाखल करण्यात आले असून, आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.