Murbe Port Project Protest Palghar: पालघर जिल्ह्याच्या मुरपे येथे प्रस्तावित असलेल्या मुरपी १५ बंदर प्रकल्पासाठी आज, पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांच्या (Murbe Port Project Protest Palghar) अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) जनसुनावणीचे आयोजन केले होते. पालघरमधील क्रीडा संकुलाजवळ आयोजित केलेल्या या सुनावणीला ५५ गावांतून तब्बल ६,००० हून अधिक ग्रामस्थांनी उपस्थिती लावत, कंपनीविरोधात असलेला आपला प्रखर विरोध दर्शवला.
Diwali Car Offers: दिवाळीत गाडी घेतली तर ‘हे’ होतील फायदे
जन सुनावणी सुरू होताच ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांनी एकत्र येत जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Murbe Port Project Protest Palghar) या प्रस्तावित बंदरामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण आहे. स्थानिक शेतकरी आणि मच्छीमार बांधवांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे बंदर उभे राहिल्यास परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होईल आणि समुद्रातील मासेमारीवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे, हजारो शेतकऱ्यांवर आणि मासेमारी करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण आणि उपजिविकेवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन, स्थानिकांनी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
Cough syrup news: कप सिरप औषध प्रकरणात नवी अपडेट; टोल फ्री नंबर जारी
जन सुनावणीच्या वेळी ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाची शक्यता असल्याने प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी (Murbe Port Project Protest Palghar) कडक तयारी केली होती. सुनावणीच्या ठिकाणी १,२०० हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आक्रमक पवित्रा आणि प्रशासनाची खबरदारी यामुळे या जनसुनावणीच्या ठिकाणी प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मुरपी १५ बंदर प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी एकमुखाने केलेला हा तीव्र विरोध, कंपनी आणि प्रशासनासाठी एक मोठे आव्हान उभे करणार आहे. आता या जन सुनावणीतील नोंदी आणि ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.