कर्वेनगरमधील विद्यार्थी लैंगिक अत्याचारप्रकरणी संस्थाचालकाला अटक

483 0

पुण्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून संस्अथचालकांना अटक केली आहे. अन्वित सुधीर फाटक असे या संस्थाचालकाचे नाव आहे. कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर लैंगिक व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले. मुलांवर अत्याचार करतानाचे त्याचे मोबाईलमध्ये रेकॉडिंग करुन ती इतर लोकांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच मुलाला शपथ देऊन मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर पासून १४ डिसेंबर पर्यंत सुरु होता.

नेमकं काय झालं ?

पुण्यातील कर्वेनगर भागात असलेल्या एका नामांकित शाळेत 39 वर्षे आरोपी हा डान्स शिक्षक म्हणून नोकरी करत होता. 2022 मध्ये या शाळेने त्याला कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवलं होतं. शाळेत रुजू झाल्यापासून हा शिक्षक आत्ता सहावी शिकणाऱ्या एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. दोन दिवसांपूर्वी या शाळेत विद्यार्थ्यांचं समुपदेशन सुरू होतं. त्यादरम्यान विद्यार्थ्याने आपल्याबरोबर घडलेला प्रकार समुपदेशकाला सांगितला. त्यानंतर तात्काळ समुपदेशक आणि पोलिसांत धाव घेतली. घडलेला प्रकार संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि शाळेला देखील कळवला.

या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आणखी एका दहा वर्षाच्या मुलाबरोबर असाच प्रकार घडल्याचं समोर आलं. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल केला. संबंधित शाळेने या शिक्षकाला निलंबित केलं असून या सगळ्यात शाळा प्रशासन पोलिसांना सहकार्य करेल असं सांगितलं.

दरम्यान आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याने याआधी किंवा शाळेतील इतर आणखी मुलांबरोबर असं काही कृत्य केलं आहे याचा तपास सुरू आहे. सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. तर पोलिसांकडून शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

पालकांच्या चिंतेत भरशिक्षणाच्या माहेर घरात घडलेल्या या घटनेनंतर अनेक पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आपली मुलं शाळेतही सुरक्षित नसल्याने पालक तणावात आहेत. या शाळेतील इतर पालकांनी ही शाळा प्रशासनाची भेट घेत आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शाळेतील सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शिक्षकांची चारित्र्य पडताळणी व्हावी अशा मागण्या केल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!