शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विजतोडणीला स्थगिती देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

92 0

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज विरोधी पक्षाने शेतकर्‍यांच्या वीज तोडणीचा प्रश्न उचलून धरला आणि त्यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर देत मोठी घोषणा केली आहे.

नितीन राऊतांनी केलेल्या घोषणेनुसार पुढील 3 महिन्यांसाठी वीज तोडणी थांबवण्यात आली आहे तर तोडलेली वीज देखील पूर्ववत केली जाणार आहे. पीक शेतकर्‍यांच्या हातात येईपर्यंत वीज तोडणी थांबवत असल्याचे ते म्हणाले आहेत. सोबतच कृषी ग्राहकांना दिवसभर वीज मिळावी म्हणून समिती नेमली आहे ते एक महिन्यात अहवाल देणार असल्याची माहिती देखील नितीन राऊत यांनी सभागृहात दिली आहे.

मागच्या सरकारने वीज बिलं दिलेली नाहीत. बँकेचे कर्ज असल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. परिणामी वीज पुरवठा खंडित करावा लागल्याचं सरकारचं मत आहे. डिसेंबर 2021 अखेरीपर्यंत महावितरणाची थकबाकी 63842 कोटी रुपये इतकी झालेली आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन कापणार नाही या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेचे काय झाले? शेतकरी कुणाला माफ करणार नाही असे म्हणत आक्रमक झाले. त्यानंतर गदारोळ झाल्याने दुपारी एक वाजता सभागृहाचं काम स्थगित करण्यात आले आहे. हे देखील वीज तोडणीमुळे मागील काही दिवसांत शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. पण सरकार हे मुद्दम करत नसल्याचे स्पष्टीकरण नितीन राऊत यांनी दिले आहे. सरकार सवलती देत असलं तरीही वीज बिल वेळेत भरा असं आवाहन त्यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Dagdushet Ganpati

Dagdushet Ganapati : ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारण्यात येणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

Posted by - June 21, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganapati), सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील…
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News : अभ्यास करत नाही म्हणून शिक्षकांनी नोंदवहीत केली नोंद; ते पाहून वडील संतापले अन्…

Posted by - October 18, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : आजकाल तरुण पिढीमध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका शुल्लक कारणावरून ते आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.…

पुण्यात ‘आप’चा कार्यकर्ता मेळावा; पुणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

Posted by - June 2, 2022 0
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मैदानात असून त्यांच्याकडून जोरदार तयारी…

खर्गे की थरूर; तब्बल 24 वर्षानंतर होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - October 17, 2022 0
नवी दिल्ली: बहुचर्चित अशा काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान होत असून मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी दुसऱ्यांदा शरद पवारांसोबत ‘त्या’ बैठकीला येणं टाळलं

Posted by - September 15, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *