Top News Marathi Logo

Onion farmers protest Daund Maharashtra: दौंडमधील शेतकरी आंदोलन अधिक तीव्र; बच्चू कडूंचा पाठिंबा, राज्यव्यापी लढ्याची हाक

87 0

Onion farmers protest Daund Maharashtra: दौंड तालुक्यातील कानगाव येथे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक तीव्र (Onion farmers protest Daund Maharashtra)  झाले असून, या आंदोलनाला माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. बच्चू कडू यांनी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे थेट आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आणि हे आंदोलन केवळ दौंडपुरते मर्यादित न ठेवता राज्यव्यापी करण्याची हाक दिली आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे शेतकरी आक्रोश कृती समितीच्या आंदोलनाला मोठी उभारी मिळाली आहे.

Afghan boy stowaway Delhi flight: अफगाणी मुलगा विमानाच्या चाकात बसून पोहोचला दिल्लीला; काय आहे नेमकं प्रकरण?

कानगाव येथील शेतकरी प्रामुख्याने दोन मागण्यांसाठी ठाम आहेत: कांद्याला किमान ३५ रुपये प्रति किलो हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची (Onion farmers protest Daund Maharashtra) संपूर्ण कर्जमाफी व्हावी. गेली सहा दिवस शेतकरी आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत. यापूर्वी अनेक निवेदने देऊनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिविवस वाढत असून, काल शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत आणि ‘बोंबाबोंब’ करत सरकारचा निषेध केला. त्यांच्या या अनोख्या निषेधामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
हे आंदोलन केवळ स्थानिक नसून, संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथांचे प्रतिनिधित्व करत आहे, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

SHIRUR AMOL JEWELLER ROBBERY CCTV: शिरूरमधील अमोल ज्वेलर्सवर दरोडा; 1 कोटी 38 लाखांचा ऐवज लंपास

त्यांनी आंदोलकांना पाठवलेल्या संदेशात म्हटले की, “तुमचं हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही दाखवलेल्या एकजुटीमुळेच सरकारला (Onion farmers protest Daund Maharashtra) झुकता येईल. तुमच्या मागण्या योग्य आहेत आणि प्रहार संघटना तुमच्यासोबत आहे.” त्यांनी आंदोलकांना एकजुटीने लढत राहण्याचे आवाहन केले आणि २८ ऑक्टोबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. “या आंदोलनातून संपूर्ण कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव आणला जाईल. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू यांच्या या पाठिंब्यामुळे आंदोलनाचे स्वरूप बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. या आंदोलनाला आता राजकीय वजन मिळाल्याने सरकारला याकडे दुर्लक्ष करणे कठीण जाईल. दौंड आणि परिसरातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कांद्याच्या दराच्या अस्थिरतेमुळे त्रस्त आहेत. कधी अतिवृष्टी, तर कधी अवर्षणामुळे पिकांचे नुकसान होते आणि त्यातही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली आहे, परंतु आता कर्जाचे हप्ते फेडणे त्यांना शक्य होत नाहीये. अशा परिस्थितीत संपूर्ण कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे.

या आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने सांगितले की, “आम्ही अनेक वर्षांपासून आमच्या हक्कासाठी लढत आहोत, पण कोणीही आमची दखल घेतली नाही. आता बच्चू कडूंसारख्या शेतकऱ्यांच्या नेत्याने पाठिंबा दिल्याने आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. आम्ही आता मागे हटणार नाही.”

Neelam Gorhe Navratri Visit: नवरात्रीत तांबडी जोगेश्वरी देवीदर्शनानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन; काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे? 

सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये या आंदोलनाला मोठे महत्त्व आले आहे. येत्या काळात हे आंदोलन राज्यभर पसरण्याची शक्यता असून, सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कांदा उत्पादकांना योग्य न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!