शेतीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून सात बारा उताऱ्याकडे पाहिलं जातं. याच सातबारा उताऱ्यात आता बदल झाले असून तब्बल 50 वर्षांनी हे बदल करण्यात आले आहेत.
सात बारा उताऱ्यात कोणते झाले बदल?
1. गाव नमुना 7 मध्ये गावच्या नावासह कोड क्रमांक
2. लागवड योग्य आणि लागवड नसलेलं क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवलं जाणार
3. शेतीसाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ तर बिगर शेतीसाठी ‘आर चौरस मीटर’ अशी नवीन मापन पद्धत वापरणार
4. यापूर्वी ‘इतर हक्क’मध्ये मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार
5. मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई करारांच्या नोंदी कंसात दाखवण्याऐवजी आडवी रेष मारली जाणार
6. फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी ‘प्रलंबित फेरफार’ असा स्वतंत्र रखाना असणार
7. सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार केला जाणार
8. दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार, ज्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येतील
9. गट क्रमांकाबरोबर शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रखान्यात शेवटी दाखवली जाणार
10. बिगरशेतीसाठी ‘आर चौरस मीटर’ हेच एकक असणार, जुडी व विशेष रकाने काढून टाकण्यात आले
11. बिगरशेती सातबारा उताऱ्याच्या शेवटी क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार
सरकारने 3 मार्च 2020 रोजी सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासही मान्यता दिली होती. या सुधारणांमुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि नागरिकांसाठी समजण्यास सोपा झाला आहे.