आरोग्यवर्धिनी कोथिंबीर, कोथिंबीरीचे आरोग्यासाठी फायदे जाणून घ्या

251 0

कोथिंबिरीचा वापर बहुतांश सर्व पदार्थांमध्ये केला जातो. अन्नपदार्थांवर कोथिंबीर बारीक चिरून पसरवली की, त्या पदार्थांची चव वाढते. शिवाय कोथिंबिरीच्या वड्या चविष्ट लागतात. कोथिंबीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

कोथिंबिरीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्व ए व बी असते. कोथिंबिरीचे पाणी पिणे आरोग्यासाठी गुणकारी आहे. यासाठी हिरवीगार कोथिंबीर रात्रभर कापून स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून हे पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते.

पोटाशी संबंधित समस्यांवर कोथिंबीर फायदेशीर ठरते. कोथिंबिरीचा आहारात समावेश केला की, पचनक्रिया सुधारते. पोटदुखी, अपचन, गॅस या त्रासांवर पाणी प्यावे.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात कोथिंबिरीच्या पाण्याचा समावेश करावा. यामुळे वजन कमी होऊन शरीरातील मेद कमी व्हायला मदत होते.
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही कोथिंबिरीच्या पाण्याचा औषध म्हणून वापर करतात. मात्र यासाठी .डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन करा.

Share This News
error: Content is protected !!