कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून महिलेवर बलात्कार, हिंजवडीमधील घटना

571 0

पिंपरी- काहीतरी बोलण्याचे निमित्त सांगून महिलेला घरी आणले. तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मारुंजी येथे घडली. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

शुभम विनायक बने असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याने पीडित महिलेला भेटायला बोलावले. तिच्याशी काहीतरी बोलायचे आहे असे सांगून तिला आपल्या दुचाकीवर बसवून मारुंजी येथील आपल्या राहत्या घरी नेले. त्याठिकाणी तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला आपल्या घरातून बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!