लज्जास्पद! सरकारनं पेट्रोल डिझेल दर कपातीचा निर्णय घेतलाच नाही; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला राज्य सरकार वर निशाणा

302 0

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 7 आणि 6 रुपये प्रतिलीटर कपात केली. केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारनेही काल व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. व्हॅटमध्ये अनुक्रमे 2.8 आणि 1.44 रुपये प्रतिलीटर कपात केली. राज्य सरकारच्या याच घोषणेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या व्हॅट कपातीच्या निर्णयावर टीका करताना फडणवीस म्हणाले, “लज्जास्पद. महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे.

महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली.

Share This News
error: Content is protected !!