SANJAY RAUThttps://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/03/SANJAY-RAUT-e1746367522418.jpg

मोठी बातमी ! ‘दुसरा उमेदवारही आमचाच ! आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही !’ संजय राऊत यांची घोषणा

257 0

मुंबई- आम्ही कोणत्याही परिस्थितीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. राज्यसभेसाठी दुसरा उमेदवारही शिवसेनेचाच असेल अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. 

राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणी असो. राज्यसभेच्या दोन जागांवर शिवसेनेचेच उमेदवार उभे राहतील आणि निवडून जातील, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत हे सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी म्हटले की, शिवसेना अनेक वर्षापासून राजकारणात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याच जाहीर केले आहे. त्यांनी ही घोषणा केली होती, त्याअर्थी त्यांनी जिंकून येण्यासाठी लागणाऱ्या ४२ मतांची बेगमी केली असावी, असा माझा समज होता. पण संभाजीराजे यांच्याकडे तेवढी मते नव्हती. तेव्हा संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे मदत मागितली. पण आम्हाला आमचे २ उमेदवार निवडून आणायचे आहेत, मग आम्ही त्यांना आमची मतं कशी देणार? आम्हाला शिवसेनेला उमेदवार निवडून आणायचा आहे. राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही.

Share This News
error: Content is protected !!