आधी भरमसाठ किमती वाढवायच्या आणि; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर निशाणा

171 0

केंद्र सरकारने आज पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सोबतच घरघुती सिलेंडरच्या किंमतीत सबसीडी देण्याचा निर्णयाची घोषणा केली आहे. या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मात्र केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही.आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!