सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त;

187 0

केंद्र सरकारनं अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल आता स्वस्त झाले आहे.

पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात असताना केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर हा 8 रुपयांनी तर डिझेलवरील अबकारी कर हा 6 रुपयांनी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये 9.50 रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये 7 रुपयांची घट होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये क्रूड ऑईलच्या  किंमती झपाट्याने खाली येत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र कमी होत नव्हते. तसेच घरगुती सिलेंडर आणि सीएनजीच्या  किंमती गगनाला भिडल्या होत्या. घरगुती सिलेंडरच्या वाढणाऱ्या दरांबद्दल मध्यमवर्गीय आणि गृहिणी नाराज होत्या. अखेर मोदी सरकारने देशवासियांना मोठा दिलासा देत वर्षाला मिळणाऱ्या बारा सिलेंडर मागे दोनशे रूपयांची सबसीडी देण्याचाही निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!