Crime

सीएनजी पंपावर गर्दी होते या कारणावरून कर्मचाऱ्याला टोळक्याची मारहाण, पुण्यातील घटना

440 0

पुणे – सीएनजी पंपामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा राग मनात धरून टोळक्याने पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना नऱ्हे परिसरातील युवांश गॅस स्टेशन पंपावर आज सकाळी ९ वाजता घडली.

या पंपावर गॅस भरण्यासाठी नेहमीच गर्दी होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच रागातून एका युवकाने पंपावरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. त्याचे पर्यवसान वादात झाले आणि त्यामध्ये या तरुणाने त्याच्या इतर सात ते आठ साथीदारांना बोलावून कर्मचाऱ्याला मारहाण केली.

या मारहाणीत कर्मचाऱ्याच्या कानाला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी धाव घेतली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात घाबरत पसरली होती. सिंहगड पोलीस तपास करत आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!