औरंगाबाद हादरले ! एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

503 0

औरंगाबाद- औरंगाबाद शहरात एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय कॉलेज युवतीची भरदिवसा हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कॉलेजजवळून तिला ओढत नेत तिची निर्घृण हत्या करण्यात आली. भर दिवस ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

ग्रंथी सुखप्रीत प्रितपालसिंग वय १९ असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगिरी महाविद्यालयाजवळून ओढत नेत या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे. यामध्ये आरोपीने तरुणीला कॉलेजपासून चक्क २०० फूट ओढत नेत तिची हत्या केली. मृत युवती हे बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती.

ग्रंथीचा मृतदेह आज देवगिरी महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात आढळून आला. तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून आरोपीच्या शोधात पथक तैनात करण्यात आले आहे. हत्या झालेली मुलगी आणि आरोपी दोन्ही एकाच समाजातील असून दोन्ही एकमेकांना चांगले ओळखत होते. अशी माहिती समोर आली आहे.

Share This News
error: Content is protected !!