वसंत मोरे यांचे समर्थक माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे यांचा मनसेला रामराम ?

249 0

पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमध्ये अंतर्गत कुरबुरी, तक्रारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. नगरसेवक वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक असलेले मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे मनसेला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे.

निलेश माझिरे हे पक्षातर्गत गटबाजी आणि वादामुळे पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा असून त्यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली आहे. येत्या दोन दिवसात ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असे बोलले जात आहे. दरम्यान वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत जाऊ लागल्याने मनसेत मात्र खळबळ उडाली आहे.

येत्या २२ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे. मनसे कार्यकर्ते या सभेच्या तयारीला लागले आहेत. त्यापूर्वीच मनसेमध्ये गळती सुरु झाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!