आकुर्डीत पालखी आगमनापूर्वी विकासकामांसाठी तरतूद करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

408 0

पिंपरी- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढील महिन्यात 21 जून रोजी शहरात येत आहे. दरवर्षी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असतो. या पार्श्वभूमीवर आकुर्डीतील विविध विकासकामे मार्गी लावावीत यासाठी भरीव तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस इखलास सय्यद, महिला उपाध्यक्ष आशा शिंदे, महिला सरचिटणीस विमल गायकवाड आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, येत्या २१ जून रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी आकुर्डी येथे येत आहे. सदर पालखी येण्यापूर्वी प्रभागातील स्थापत्य व आरोग्य विषयक तसेच इतर किरकोळ कामे होणे आवश्यक आहे. परंतु ‘अ ‘ क्षेत्रीय कार्यालयाकडे आर्थिक तरतूद नसल्याने कामांना चालना मिळत नाही. याबाबत ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय मुख्य समन्वयक तथा शहर अभियंता श्रीकांत सावने यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधून सूचित केले. त्याप्रमाणे काही कामे झाली आहेत.

परंतु अद्याप वारकऱ्यांसाठी निवास, मंडप, यासह परिसरातील स्थापत्य विषयक कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यासाठी त्वरित तरतूद उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!