Breaking news ! मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

426 0

मुंबई- ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेनंतर पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली होती. ४ मे रोजी शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर प्रसार माध्यमांशी बोलणाऱ्या संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आलेले असताना संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आपल्या गाडीमधून पसार होत पोलिसांना गुंगारा दिला होता. या प्रकारात एक महिला पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाली होती.

त्यानंतर या दोघांचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला. दरम्यान संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर 17 मे रोजी सुनावणी झाल्यानंतर निकाल 19 मे रोजी देण्यात येईल, असे मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर या दोघांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Share This News
error: Content is protected !!