पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर

450 0

पुणे- पुणेमहापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 23, तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव आहेत.

त्यासाठीची लोकसंख्यानिहाय याद्या आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे 25 प्रभाग राखीव असणार आहेत. पालिका निवडणुकीसाठी आयोगाने पुणे शहराची 2011ची 35 लाख 56 हजार 824 इतकी लोकसंख्या गृहीत धरली असून, त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 4 लाख 80 हजार 17 आहे. तर अनुसूचित जमाती लोकसंख्या 41 हजार 561 आहे. त्यानुसार लोकसंख्या गृहीत धरून हे आरक्षित प्रभाग निश्‍चित करण्यात आले आहेत.

25 पैकी 13 जागा या महिलांसाठी राखीव असणार असून त्यात 12 जागा अनुसूचित जाती महिला, तर 1 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी असणार आहे. तर महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत स्वतंत्रपणे काढली जाणार आहे.
प्रभाग पुढील प्रमाणे

प्रभाग क्रमांक 1 – धानोरी- विश्रांतवाडी –

प्रभाग क्रमांक 3 – लोहगाव-विमाननगर

प्रभाग क्रमांक 4 – पूर्व खराडी-वाघोली

प्रभाग क्रमांक 7 – कल्याणीनगर-नागपूर चाळ

प्रभाग क्रमांक 8 – कळस-फुलेनगर

प्रभाग क्रमांक 9 – येरवडा

प्रभाग क्रमांक 10 – शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी

प्रभाग क्रमांक 11 – बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्रभाग क्रमांक 12 – औंध-बालेवाडी

प्रभाग क्रमांक 19 – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ

प्रभाग क्रमांक 20 – पुणे स्टेशन- मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता

प्रभाग क्रमांक 21 – कोरेगाव पार्क-मुंढवा

प्रभाग क्रमांक 22 – मांजरी -शेवाळेवाडी

प्रभाग क्रमांक 26 – वानवडी गावठाण-वैदुवाडी

प्रभाग क्रमांक 27 – कासेवाडी-लोहियानगर

प्रभाग क्रमांक 37 – जनता वसाहत-दत्तवाडी

प्रभाग क्रमांक 38 – शिवदर्शन-पद्मावती

प्रभाग क्रमांक 39 – मार्केट यार्ड- महर्षीनगर

प्रभाग क्रमांक 42 – रामटेकडी-सय्यद नगर

प्रभाग क्रमांक 46 – महंमदवाडी-उरूळी देवाची

प्रभाग क्रमांक 47 – कोंढवा बु.- येवलेवाडी

प्रभाग क्रमांक 48 – अप्पर- सुपर इंदिरानगर

प्रभाग क्रमांक 50 – सहकारनगर-तळजाई

प्रभाग क्रमांक 14 – पाषाण-बावधन बुद्रुक

Share This News
error: Content is protected !!