दाक्षिणात्य ट्रान्सवुमन मॉडेलने लाइव्ह चॅटदरम्यान पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या

512 0

एर्नाकुलम- केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी २६ वर्षीय ट्रान्सवुमन मॉडेल शेरीन सेलीन मॅथ्यू हिने आत्महत्या केली. लाइव्ह चॅटदरम्यान पंख्याला गळफास लावून तिने आपले जीवन संपवले. मंगळवारी ही घटना घडली.

आत्महत्या करताना शेरीन ज्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅटिंग करत होती, त्या व्यक्तीने शेरीनच्या हालचालीची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. मात्र, पोलिस अधिकारी तिच्या घरी पोहोचेपर्यंत शेरीनने आत्महत्या केलेली होती.

तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही मात्र ती काही दिवसांपासून डिप्रेशनमुळे त्रस्त होती. तपास प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह कलामसेरी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!