महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण टिकविण्याची हीच ती वेळ ! काँग्रेस नेत्याची ‘ही’ पोस्ट चर्चेत

368 0

मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांचे भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

महाराष्ट्रात मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवायच घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असताना मध्यप्रदेश राज्याने हे कसे काय साध्य केले? हा प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारला जात आहे. ही परवानगी देत असताना मात्र या निवडणूका एका आठवड्यातच जाहीर कराव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.

सत्यजित तांबे यांनी ट्विट करून म्हंटल आहे महाराष्ट्रात OBC आरक्षण टिकविण्याची हीच ती वेळ
मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करून मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यास आरक्षण मिळू शकते, हेच आजच्या निर्णयाने दाखवून दिलं आहे. आता आपल्या #MVA सरकारनेही केंद्र सरकारवर अवलंबून न राहता हा डेटा गोळा केला पाहिजे !

 

Share This News
error: Content is protected !!